अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअरच्या बातम्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये होत्या. दोघांनाही बऱ्याचदा एकत्र बघण्यात आलं होतं. अखेर तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याबाबत मौन सोडत प्रेमाची कबुली दिली. आता तमन्नाने लग्न कधी करणार याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इंडिया टुडे’शी बोलताना तमन्नाने लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “लग्न ही मोठी जबाबदारी आहे. लग्न यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बाकीचे लोक लग्न करत आहेत म्हणून मी करणार नाही. जोपर्यंत मला वाटतं नाही की मी लग्नासाठी तयार आहे, तोपर्यंत मी लग्न करणार नाही.

दरम्यान, तिच्या आणि विजयच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबद्दल विचारल्यावर तमन्ना म्हणाली, “विजय वर्माशी माझं आपोआप खूप छान बाॅण्डिंग झालं. आयुष्यात खूप मेहनत करून यशस्वी झालेल्या महिलांची एक समस्या असते, ती म्हणजे आम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. पण काही गोष्टी सहज मिळाल्या की तुम्हाला प्रत्येक वेळी मेहनत करण्याची गरज नाही, हे लक्षात येतं. मैत्री खूप मोठी गोष्ट आहे, कारण एका मित्राबरोबरच तुम्हीही किती जोरात हसू शकता, एखाद्या प्राण्यासारख्या आवाजातही तुम्ही कोणताही विचार न करता हसू शकता. विजय वर्माची मला मनापासून काळजी वाटते. तो माझं हॅप्पी प्लेस आहे.”

तमन्नाच्या वर्कफ्रण्टबद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘जी करदा’ चित्रपट १५ जूनला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. अनुरिमा शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात सुहेल नय्यर, सायन बॅनर्जी, आशिम गुलाटी, हुसैन दलाल आणि अन्या सिंग यांच्याही भूमिका आहेत.