प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू-बाळू यांच्या जोडीतील ‘बाळू’ म्हणजेच अंकूश खाडे यांचे आज निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. काळू-बाळू या एका वगनाट्यातील पात्रामुळे लोककलेच्या क्षेत्रात लहू-अंकुश खाडे या कलावंतांची ओळख झाली. त्यांचे नाव महाराष्ट्राच्या तमाशा रसिकांच्या तोंडपाठ आहे.
लहू संभाजी खाडे आणि त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे यांच्यातील अंकूश म्हणजेच बाळूचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. बाळू अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही चालू होते. मात्र आज उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
लहू खाडे आणि अंकूश खाडे यांनी ’जहरी प्याला’ या वगनाट्यात काळू-बाळू नावाच्या पोलिस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले. फक्त पश्चिम महाराष्ट्रातचं नव्हे तर मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातही लहू खाडे यांच्या तमाशातील त्यांच्या भूमिकेमुळे रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर हे खाडे यांचे मूळगांव होते. लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. तमाशा क्षेत्रातील चौथी पिढी कार्यरत होती. त्यांचा राम नाही राज्यात हा वगही गाजला होता. काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी इ.स. १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन गौरवण्यात आले होते.
‘काळू-बाळू’ जोडीतील ‘बाळू’यांचे निधन
प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू-बाळू यांच्या जोडीतील 'बाळू' म्हणजेच अंकूश खाडे यांचे आज निधन झाले.
आणखी वाचा
First published on: 26-04-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamasha artist ankush khade dies