बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा बहुप्रतिक्षित तमाशा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविणारा आहे. दीपिका-रणबीर जोडी रुपेरी पडद्यावर ‘तमाशा’च्या माध्यमातून पुन्हा एकत्र आल्याने केमेस्ट्रीचा नजराणा चाहत्यांना अनुभवता येईल. अर्थात, इम्तियाझ अलीचा चित्रपट असल्यामुळे केमेस्ट्रीचा तडका देखील तितकाच दमदार असेल. चित्रपटाचा ट्रेलर देखील त्याची चाहुल देऊन जाणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चित्रपटात रणबीर कपूर वेद नावाच्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या मुलाची भूमिका साकारत आहे. दिनक्रमाला वैतागलेल्या वेदच्या आयुष्यात त्याच्या विचारसणीशी मेळ खाणारी मुलगी(दीपिका) येते. भावनांच्या जंजाळात अडकून बसणे या दोघांनाही आवडत नाही. त्यामुळे दोघेही एकमेकांशी खोटे बोलण्याची शपथ घेताना दिसतात. दोघांनी जगभर एकत्र केलेला प्रवास त्यातून फुलत जाणारी त्यांची मैत्री आणि पुढे दोघांमध्ये निर्माण होणारे पेचप्रसंग ट्रेलरमध्ये दिसून येतात. अखेरीस दोघांच्या नात्याला एक वेगळा ट्विस्ट देखील देण्यात आलाय. हा ट्विस्ट नक्कीच चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढविणारा आहे.