दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या विनोदी शैलीतील सहाय्यक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले तमिळ अभिनेते मोहन यांचा मृतदेह शुक्रवारी सापडला. त्यांचा मृतदेह मदुराईतील तिरुपरकुंडम मंदिराजवळील रस्त्यावर आढळून आला. ६० वर्षीय मोहन कामाच्या शोधात होते, ते आर्थिक संकटाचा सामना करत होते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने ‘एएनआय’ने दिली आहे.
नितीन देसाई अनंतात विलीन! त्यांच्या स्वप्नमयी ND स्टुडिओतच कुटुंबियांनी दिला अखेरचा निरोप
मोहन मूळचे सेलम जिल्ह्यातील मेत्तूरचे रहिवासी होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या होत्या. पण ते चित्रपटसृष्टीत काम मिळविण्यासाठी धडपड करत होते. मूळ गावी गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिघडल्याने ते मेन चॅरियट रोडवर राहत होते. वृत्तानुसार, ३१ जुलै रोजी स्थानिकांना त्यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
नितीन देसाईंचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर, पत्नी व मुलीचे फोटो आले समोर
पोलिसांनी सांगितलं की मोहन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मदुराई सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाईल.
दरम्यान, मोहन यांनी १९८९ मध्ये कमल हसन स्टारर ‘अपूर्व सगोधररगल’ मध्ये काम केलं होतं. यातील त्यांची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटात त्यांनी साऊथ सुपरस्टार कमल हसन यांच्या मित्राची भूमिका केली होती. याशिवाय त्यांनी ‘नान कडवूल’ या चित्रपटातही काम केले होते.