एका २९ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपा नावाच्या या अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. दीपाचे खरे नाव पॉलिन जेसिका होते, पण ती दीपा या तिच्या स्टेज नावाने लोकप्रिय आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमधून सापडला आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपाने हे पाऊल लव्ह लाईफमध्ये सुरू असलेल्या समस्यांमुळे उचलले आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील उदयोन्मुख अभिनेत्री दीपा हिने १८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. दीपाचा मृत्यू ही आत्महत्या मानून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, दीपा एका मुलावर खूप प्रेम करत होती, पण दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नव्हतं. नात्यातील अडचणींमुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, दीपाच्या आत्महत्येमागील लव्ह अँगलचाही तपास करून पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यावर ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया काय असती? रणबीर म्हणाला, “ते बॉक्स ऑफिसच्या…”
दीपा चेन्नईच्या विरुगम्बक्कम मल्लिकाई एव्हेन्यूमध्ये एकटीच राहत होती. दीपाचे नातेवाईक तिला सतत फोन करत होते, पण ती कॉलला उत्तर देत नव्हती. दीपा फोन उचलत नसल्याने तिचा मित्र प्रभाकरन तिच्या घरी पोहोचला. प्रभाकरनने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
दीपा ही एक तमिळ अभिनेत्री असून ती या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वैद्य’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रेमा महेंद्र मुख्य भूमिकेत होते. याशिवाय दीपा तमिळ सुपरहिट थ्रिलर चित्रपट थुप्परीवलनमध्येही छोट्या भूमिकेत दिसली होती. यावर्षी प्रदर्शित झालेल्या वैद्य चित्रपटानंतर दीपाला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या.
अलिकडेच तमिळ इंडस्ट्रीत दोन आत्महत्येच्या घटना घडल्या. दीपाच्या आत्महत्येपूर्वी तमिळमधील लोकप्रिय गीतकार कालिबान यांची मुलगी थुरिगाई हिनेही आत्महत्या केली होती. थुरिगाईने लग्न करावे अशी आई-वडिलांची इच्छा होती, जरी तिला ते मान्य नव्हते. घरच्यांनी दबाव आणल्याने थुरिगाईने आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यानंतर आता दीपाने गळफास घेत जीवन संपवलं आहे.