तरुणपणी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते किंवा अभिनेत्री यांची परिस्थिती वृद्धापकाळात चांगली असेलच असं नाही. अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या उतारवयात अगदी दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागतो. असाच काहिसा प्रकार एका दाक्षिणात्य अभिनेत्री बरोबर घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळची प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री जयाकुमारी किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत आहे. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून चेन्नईतील सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. या ७२ वर्षीय अभिनेत्रीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळतेय. अभिनेत्रीने आर्थिक मदतीसाठी लोकांना आवाहन केलं होतं, त्यानंतर तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी त्यांना मदत केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याशी घटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहतेय मराठमोळी रेशम टिपणीस; दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली…

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी जयाकुमारीच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच त्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या रुग्णालयातील बिलांची भरपाई सरकार करेल आणि तिलं घर उपलब्ध करून दिलं जाईल, असं आश्वासनही दिलं. जयाकुमारीला तीन मुलं असून तिच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी कोणीही रुग्णालयात आलं नाही, अशीही माहिती समोर आली आहे.

मुस्लीम आई, दोन लग्न, परवीन बाबीशी अफेअर अन् स्वतःच्याच मुलीबरोबर…; महेश भट्ट यांच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्से

जयकुमारीने १९६८ साली मल्याळम चित्रपट कलेक्टर मलाथीतून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर, तिने फुटबॉल चॅम्पियन, प्रेम नजर, नुत्रुक्कू नूरूमधील जयशंकर आणि डॉ. राजकुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले. अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. तिला सध्या तमिळनाडू सरकारने मदत केली आहे.