तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका उमा रामानन यांचं दीर्घ आजाराने चेन्नईत निधन झालं आहे. बुधवार १ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६९ वर्षांच्या होत्या. उमा रामानन यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचे पती संगीतकार ए.व्ही रामानन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उमा काही दिवसांपासून आजारी होत्या. १ मे रोजी त्यांची प्रकृती आणखी खालावली. संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन कशामुळे झालं याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Iqbal Chagla passed away, Senior lawyer Iqbal Chagla,
ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

हेही वाचा : Video : गौरव मोरेने घेतली अलका कुबल व भरत जाधव यांची भेट! पाहताक्षणी दोघांच्या पाया पडला अन्…, सर्वत्र होतंय कौतुक

तमिळ चित्रपटसृष्टीत उमा यांचं मोठं योगदान होतं. या लोकप्रिय गायिकेच्या पश्चात तिचे पती ए.व्ही.रामानन आणि त्यांचा मुलगा विघ्नेश रामानन हे आहेत. उमा यांनी तमिळ चित्रपटांमधील अनेक लोकप्रिय गाणी गायली आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत उमा यांनी ६ हजारांहून अधिक मैफिलींमध्ये ( लाइव्ह कॉन्सर्ट ) भाग घेतला होता.

हेही वाचा : अदिती-सिद्धार्थने तेलंगणातील ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला? अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं कारण…

उमा व त्यांचे पती दोघे मिळून एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करायचे. त्या प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होत्या. ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांच्यामुळे उमा यांना प्रसिद्धी मिळाली. इलैयाराजांशिवाय उमा यांनी मणि शर्मा, देवा, विद्यासागर या संगीतकारांसाठीही गाणी गायली आहेत.

हेही वाचा : Video: जेव्हा माधुरी दीक्षितला ‘आंटी’ म्हणून मारली हाक, अभिनेत्रीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

‘निझलगल’मधील पुंगाथवे थलथिरवाई या गाण्यामुळे त्यांचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं. ‘ओरु जीवन अलैथाथु’, ‘आगावा वेनिलेव्ह अरंगेत्रा वेलाई’, ‘पूपलम इसाइकुम’, ‘नी पाधी नान पडी कन्ने’ अशी त्यांची बरीच गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी १९७७ मध्ये ‘श्री कृष्ण लीला’ मधील गाण्याद्वारे कलाविश्वात पदार्पण केलं होतं.

Story img Loader