२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. थलपथी विजयने नुकतंच त्याच्या पक्षाची घोषणा केली आहे ज्याचे नाव ‘तमिलागा वेत्री कझघम’ आहे. तमिळ सुपरस्टार थलपथी विजयने पुढे सांगितले की, त्याच्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे आणि हा पक्ष पक्ष २०२६ ची विधानसभा निवडणूक लढवेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या अधिकृत निवेदनात विजय म्हणाला, “आपल्या पक्षाची नोंदणी ECI कडे करण्यात आली आहे. मी नम्रपणे सांगू इच्छितो की पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारिणीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत न लढण्याचा किंवा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.” विजयच्या या घोषणेची बरेच लोक फार आतुरतेने वाट बघत होते. रजनीकांत यांच्या पाठोपाठ तमिळ चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त लोकप्रियता विजयलाच मिळाली आहे.

आणखी वाचा : “ज्यांना वाटतं मी सुधारले…”, पूनम पांडेची शेवटची ‘ती’ मुलाखत चर्चेत

राजकारणात पूर्णपणे वेळ देणं हे फार आवश्यक आहे अन् हे ध्यानात घेऊनच विजयने हा निर्णय घेतला आहे. लवकरच विजय आपल्या सुरू असलेल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून चित्रपटविश्वातून ब्रेक घेणार आहे, जेणेकरून राजकारणात त्याला पूर्णपणे लक्ष घालता येईल. सध्या विजय हा वेंकट प्रभू यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे, अन् हा चित्रपट त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल असंही त्याच्या या निवेदनातून समोर येत आहे.

विजय म्हणाला, “मला एक भ्रष्टाचार मुक्त सेक्युलर आणि प्रगतीवादी सरकार स्थापन करायचं आहे. धार्मिक भेदभाव, जातीय दंगे आणि भ्रष्टाचारावर चालणाऱ्या राजकारणाला मला थांबवायचं आहे.” आता नेमकं इतर तमिळ अभिनेत्यांप्रमाणेच विजयदेखील राजकारणात यशस्वी होणार की नाही ते येणारा काळच ठरवेल. परंतु चित्रपटामुळे मिळालेल्या स्टारडमचा वप्रेक्षकांच्या प्रेमाचा विजयला राजकारणात नक्कीच फायदा होईल असंही काही तज्ञांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil star thalapathy vijay joins politics announces his new political party avn