‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा ही चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तानाजींची भूमिका अभिनेता अजय देवगण साकारत आहे.
‘तलवारीइतकीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता’, असं म्हणत काजोलने हा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केलं आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. सैफच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
MIND that was as sharp as a sword… #TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020.@ajaydevgn #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/zYtEycCCyr
— Kajol (@itsKajolD) October 21, 2019
MIGHT that cut deeper than a sword… #TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020.@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/QUKU9ayYQt
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 21, 2019
१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्यापही चित्रपटातील इतर व्यक्तीरेखांवरून पडदा उठणं बाकी आहे. मराठी अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका कोणती असणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नाही. ‘तानाजी’ चित्रपटाच्या निमित्तानं सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.