अभिनेता ऋषी कपूरने कंगना राणावत आणि आर. माधवनच्या बहुचर्चित ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ चित्रपटाचे कौतुक केले असून, हा चित्रपट म्हणजे आपल्या ‘प्रेम रोग’ चित्रपटाचे आधुनिक रूप असल्याचे म्हटले आहे. ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरेचा अभिनय असलेल्या ‘प्रेम रोग’ चित्रपटात श्रीमंत विधवा महिलेच्या प्रेमात पडलेल्या एका व्यक्तिची कथा पाहायला मिळते. ज्याचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. आजच्या जमान्यातला ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ हा चित्रपट ‘प्रेम रोग’ चित्रपटाचे आधुनिक रूप आहे. चित्रपट किती छान आहे, हे लाखो वेळा ऐकले असल्याने ते सांगण्याची आवश्यकता नसल्याचे ऋषि कपूर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ चित्रपटाने १०० कोटींचा धंदा नोंदविला आहे. चित्रपटात एका मध्यमवर्गीय दाम्पत्याची चार वर्षांच्या संसारानंतरची कथा दर्शविण्यात आली आहे. २२ मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कंगना दुहेरी भूमिकेत असून, जिमी शेरगिल, दीपक डोबरियाल, स्वरा भास्कर आणि मोहमद जिशान अयूब सहायक भूमिकेत आहेत.
‘प्रेम रोग’ चित्रपटाचे नवीन रूप म्हणजे ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ – ऋषी कपूर
अभिनेता ऋषी कपूरने कंगना राणावत आणि आर. माधवनच्या बहुचर्चित 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' चित्रपटाचे कौतुक केले असून, हा चित्रपट म्हणजे आपल्या 'प्रेम रोग' चित्रपटाचे आधुनिक रूप असल्याचे म्हटले आहे.
First published on: 01-06-2015 at 06:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanu weds manu returns is modern edition of prem rog says rishi kapoor