बॉलीवूडचे यावर्षी प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला कमाविण्यास अयशस्वी ठरले. आनंद एल राय यांचा ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ यावर्षीचा पहिला १०० कोटी कमाविणारा चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाच्या यशानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटाची दुस-या आठवड्यातील कमाई चांगली आहे. नुकताच चित्रपटातील मुख्य कलाकार आर माधवनने आपला वाढदिवस आणि चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी पार्टी केली होती. त्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम आज पार्टी साजरी करणार आहे. मात्र, या सर्व कलाकारांमध्ये सगळ्यांचेच लक्ष राहिल ते चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणा-या कंगना राणावतवर. बघू ‘तनू वेड्स मनू’ रिटर्न्सची कमाई त्यांच्या यशात अजून किती भर घालते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा