प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा ६०-७०च्या दशकात बऱ्याच गाजल्या. अगदी ब्लॅक अँड व्हाइट ते कलर दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. आपल्या बोलक्या चेहऱ्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या तनुजा त्या काळातल्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. आपल्या व्यवसायिक आयुष्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यातील काही गोष्टींमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या होत्या. तनुजा यांचे बरेच किस्से आजही चर्चेत असतात. अनेक हीट चित्रपट देणाऱ्या तनुजा यांना एक अशी वाईट सवय होती ज्यामुळे त्यांच्यापासून जवळपास सर्वच अभिनेत्री सेटवरही दूरच राहत असत.

अभिनेत्री तनुजा यांच्या आज वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या या सवयीबद्दल ज्याचा खुलासा त्यांच्या मुलीनेही केला होता. तनुजा यांनी ज्या काळात अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्या काळात अभिनेत्रींबद्दल समाजातील लोकांचे विचार फार वेगळे होते. त्यावेळी आतासारखी परिस्थिती नव्हती. ज्या काळात मुलींनी किंवा महिलांनी सिगारेट ओढणं अत्यंत चुकीचं मानलं जात होतं. त्या काळात तनुजा यांना सिगारेट ओढण्याची सवय लागली होती. तनुजा यांना अनेकदा सेटवर आणि सार्वजनिक ठिकाणीही सिगारेट ओढताना पाहिलं गेलं होतं. त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे सहकलाकार त्रासले होते. विशेषतः अभिनेत्री त्यांच्यापासून दूर राहत असत.

Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
swapnil joshi announces first gujarati film
स्वप्नील जोशीने दिली आनंदाची बातमी! पहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीसह करणार काम
Rashmika Mandanna Was Engaged To Actor Rakshit Shetty
रश्मिका मंदानाने १३ वर्षांनी मोठ्या ‘या’ अभिनेत्याशी केलेला साखरपुडा; ब्रेकअपनंतर आता कसं आहे दोघांचं नातं? जाणून घ्या
laxmichya paulanni fame actor dhruva datar
लोकप्रिय अभिनेत्याने सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका, जाणून घ्या…
Loksatta lokrang Shyam Benegal A Person A Director book written by Dr Savita Nayakmohite published
स्त्रीत्वाची ताकद जाणणारा चित्रकर्ता
Mamta Kulkarni
“मी त्याला भेटण्यासाठी…”, ममता कुलकर्णी विकी गोस्वामीविषयी काय म्हणाली?
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”

आणखी वाचा-तरुण दिसण्यासाठी ५० हजार रुपयांची क्रिम खरेदी केली अन्…; तब्बूनेच सांगितला ‘तो’ किस्सा

आणखी वाचा-Video: काजोल आणि बहिण तनिषामध्ये भर मंडपात जुंपली, आईने केली मध्यस्थी

तनुजा यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. त्यांना सिगारेट ओढण्याची सवय सोडायची होती आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते मात्र त्यांना हे शक्य झालं नाही असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांच्या या सिगारेट ओढण्याच्या सवयीबद्दल त्यांची मुलगी तनिषानेही एका रिअलिटी शोमध्ये मोठा खुलासा केला होता. काही वर्षांपूर्वी जेव्हा तनिषा बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. आईला सिगारेट ओढताना पाहून पाहून आपल्यालाही सिगारेटची सवय लागल्याचं तिने सांगितलं होतं.

Story img Loader