अभिनेत्री राखी सावंत आणि वादग्रस्त विधान हे समीकरण जणू ठरलेलंच. तनुश्री दत्तावर केलेल्या आरोपांवर राखी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच तिने आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे. तनुश्री दत्ता ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप राखीनं केला आहे. एका पत्रकार परिषेदत तिने हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन राखी या पत्रकार परिषदेत पोहोचली. या परिषदेत तिने तनुश्रीवर अनेक आरोप केले आहेत. ‘काही वर्षांपूर्वी तनुश्री माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यामुळे मी तिच्यासोबत बऱ्याच रेव्ह पार्ट्यांना जात असे. तेव्हा ड्रग्जच्या नशेत तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला,’ असं ती म्हणाली. इतकंच नव्हे तर हे आरोप सिद्ध करण्यासाठी दोन साक्षीदार असल्याचंही तिने स्पष्ट केलं. मात्र त्या साक्षीदारांची नावं जाहीर करणार नसून त्यांना कोर्टासमोर हजर करण्याची तयारीही तिने दाखवली.

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर राखी सावंत नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली होती. राखीने तनुश्री व्यसनाधीन होती, असा दावा केला होता. सोमवारी तनुश्रीने राखीविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. तनुश्रीच्या वतीने राखीवर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. त्यानंतर राखीनेही तनुश्रीविरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanushree dutta is lesbian touched my private parts and raped me said rakhi sawant