प्रदर्शनापूर्वीच तब्बल नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपला ठसा उमटविलेल्या बहुचर्चित ‘टपाल’ येत्या २६ सप्टेंबरला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘बॉस’, ‘ब्ल्यू’ आदी चित्रपटांचे हिंदीतील सिनेमॅटोग्राफर लक्ष्मण उतेकर यांनी टपाल चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात प्रवेश केला आहे.
‘टपाल’चा वर्ल्ड प्रिमियर दक्षिण कोरियातील ‘बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये करण्यात आला होता. तेथे ही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.  चित्रपटाची कथा एका छोट्या गावातील पोस्टमन, त्याची पत्ननी तुळसा आणि शाळेत जाणआ-या रंग्या या मुलाच्या भावविश्वावर आधारित आहे. पूर्वीच्या काळात गावामध्ये शिक्षक, पटवारी, पोस्टमन अशी काही मोजकी मंडळी शिक्षित असायची. त्यामुळे त्यांना गावात मोठा मान असायचा. शिवाय पोस्टमन तर लोकांचे टपाल घरोघरी पोहोचवायचा त्यामुळे आपल्या माणसांबद्दलची माहति पुरवणारा दुवा या भावनेतून पोस्टमनसोबत एक भावनिक नात तयार होत असे. हाच धागा पकडत टपालची कथा गुंफण्यात आली आहे. चित्रपटात १९७०च्या दशकाचा कालखंड दाखविण्यात आला असून तो प्रेक्षकांना परत एकदा डाक-टपालच्या काळात घेऊन जाणार आहे. पोस्टमन देवरामा व त्याची पत्नी तुळसा यांच्या आयुष्यात घडणारी घटना व रंग्या या लहान मुलाच्या आयुष्यावर ठसा उमटविणारे दोन दिवस याभोवती बेतलेली चित्रपटाची भावगर्भ कथा प्रेक्षकांनी खिळवून ठेवणार आहे. नंदू माधव, विणा जामकर, रोहित उतेकर, उर्मिला कानेटकर, गंगा गोगवले आणि मिलिंद गुणाजी ह्यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत रोहित नागभिडे ह्यांचे असून प्रकाश होळकर ह्यांनी गीते लिहिली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा