‘आयएनटी’, ‘अस्तित्व’ आणि साठय़े महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिंदूी एकांकिका स्पर्धेत ‘तपीश’ (साठय़े महाविद्यालय) या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर ‘ईदी’ (इंद्रधनू) या एकांकिकेला दुसरा क्रमांक मिळाला.
संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धेसाठी एकांकिका सादर झाल्या होत्या. अंतिम फेरीसाठी आमोद भट्ट व राज यादव यांनी तर प्राथमिक फेरीसाठी चंद्रकांत मेहेंदळे व प्रमोद लिमये यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यंदा दहावे वर्ष होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
सवरेत्कृष्ट दिग्दर्शन – ऋषीकेश कोळी (तपीश), लेखक – समीर पेणकर (ईदी), अभिनय – मानसी प्रभुलकर- प्रथम (तपीश), द्वितीय -सिद्धेश उपकारे (एक नई सुबह), तृतीय – चैताली जोशी (तपीश), चतुर्थ – तृप्ती गायकवाड (ईदी), प्रकाशयोजना – भूषण देसाई (तपीश), नेपथ्य – मुकुलराज (तपीश), संगीत – चंद्रकांत व महेश (एक नई सुबह).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tapshil won title in hindi act play competition
Show comments