दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून अभिनेत्री तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाार आहे. या चित्रपटात तारा सह अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता तारा अभिनया सह गाण्याच्या दुनियेत देखील पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. निर्माता साजिद नाडियाडवालाच्या ‘RX 100’ या चित्रपटातून तारा गाण्याच्या दुनियेत उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ताराने ‘लग जा गले’ हे गाणे गायले होते. तिचे हे गाणे ऐकून चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता. आता तारा ‘RX 100’ या चित्रपटात गाणे गाऊन गाण्याच्या दुनियेत पाऊल टाकणार असल्याचे म्हटले जात आहे. तिचे हे गाणे रोमॅन्टीक असून या चित्रपटातून अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेत ताराला भविष्यात एका अल्बममध्ये गाण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले आहेे.

‘RX 100’ हा एक तेलुगू सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटाने तेलुगू बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता साजिद नाडियाडवाला या चित्रृपटाची निर्मिती करणार असून मिलन लुथरिया दिग्दर्शित करणार आहेत.

याआधी अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा आणि श्रद्धा कपूर या कलाकारांनी गाण्याच्या दुनियेत पाऊल टाकले आहे. तसेच माधुरी दीक्षित देखील लवकरच तिचा पॉप अल्बम प्रदर्शित करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे.

Story img Loader