‘RX 100’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक येत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी दिसणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. आता अहान शेट्टीसह ‘RX 100’ चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार याची चर्चा सुरू आहे.

‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया ही अहानसह चित्रपटात काम करणार असल्याचे समोर आले आहे. तसेच अहान ‘RX 100’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यांचा हा चित्रपट एक प्रेम कहाणी असणार आहे.

चित्रपटासंदार्भात चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन लूथरियाने सांगितले की, ‘या चित्रपटाची कथा फार मनोरंजक आहे. चित्रपटाची कथा सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे. तसेच मुख्य भूमिकेतील कलाकार देखील दमदार आहेत. मी, अहान आणि तारा यांच्यातील अप्रतिम केमिस्ट्री पाहिली आहे. आता चित्रपट शुटिंगसाठी तयार आहे.’

चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी अहानची ट्रेनिंग सुरू आहे. तसेच ताराकडून मिळालेल्या होकारानंतर चित्रपटाचे शुटिंग सुरू करण्यात आले आहे. ‘आम्हाला आमच्या चित्रपटाची अभिनेत्री मिळाली आहे. तारा ही खूप चांगली अभिनेत्री आहे. मला असे वाटते की अहान आणि ताराची जोडी खूपच चांगली दिसेन. आम्ही जूनमध्ये चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहोत.’ असे दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाने सांगितले.

Story img Loader