छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेले १३ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शो मधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. जेठालाच्या कुठुंबाचं बोलायचे झाले तर दयाबेन, जेठालाल, टप्पू, बापूजी यांच्यासोबत एक नाव आवरजून घेतले जाते. ते म्हणजे जेठालालचा ‘साला सुंदरलाल’. प्रेक्षकांनी साला-जीजूच्या या जोडीला पण प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम दिले. जेठालाल आणि सुंदरलाल यांची तू तू मै मै पाहणे लोकांना आवडते. तसेच सुंदरलाल आणि दयाबेनच्या बहीण-भावाच्या जोडीला तोड नाही. दयाबेन आणि सुंदरलाल म्हणजेच दिशा वकानी आणि मयुर वकानी खऱ्या आयुष्यात देखील बहीण-भाऊ आहेत.
पण दयाबेन नंतर आपल्याला सुंदरलाल पण मालिकेतन गायब झालेला दिसला. कुठे गेला सुंदरलाल? दयाबेनची मालिकेत वापसी कधी होणार? असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. गेले १२ वर्षे सुंदरलालच्या भूमिकेत मयुर वकानी प्रेक्षकांना हसवत होता. दयाबेन म्हणजे दिशा वकानीने पण मालिकेतून ब्रेक घेतला. तसेच तिचा रियल आणि रील लाइफ भाऊ सुंदरलालदेखील मालिकेत दिसत नाही.
समोर आलेल्या माहिती नुसार दयाबेनने म्हणजेच दिशा वकानीने या मालिकेत परत येण्यासाठी मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निर्माते नविन दयाबेनच्या शोधात असल्याचे म्हटले जाते. तसेच सुंदरलालची भुमिका साकारणारा मयुर बेरेच वर्ष मालिकेतून गायब असल्यामूळे तो परत येईल का नाही याची पण शाश्वती देता येत नाही.आता पुढे काय होणार? कोण साकारणार दयाबेन आणि सुंदरलाल यावर मोठ प्रश्नचिनह आहे. दरम्यान मलिकेतील इतर कलाकारदेखील प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करताना दिसत आहेत.