Marathi Actress Shop Video: मराठी कलाकारांचा साधेपणा अनेकदा चाहत्यांना त्यांच्याशी जोडून ठेवतो. मालिकांमधील चेहरे घरोघरी पोहोचलेले असतात त्यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षाही भूमिकेवरून ओळखलं जातं. आपल्यासारखंच आयुष्य जगणारे हे चेहरे प्रत्येकाला आपलेसे वाटतात बहुधा यामुळेच मालिका अगदी रात्रीच्या १० नंतर जरी सुरु झाल्या तरी हिट होतात. अशाच एका मालिकेतील अभिनेत्रिचा साधेपणा दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील नेत्राचं म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडेने आपल्या कुटुंबाच्या एका खास खजिन्याविषयी माहिती दिली आहे.
तितिक्षाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करून यात स्टेशनरीचे, खेळणी याचं दुकान दाखवलं आहे. डोंबिवली पूर्व येथे असणाऱ्या खुशबू नोव्हॅलेटीचे दृश्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसह तितिक्षाने लिहिलेलं कॅप्शन सुद्धा नेटकऱ्यांना भावलं आहे.
तितिक्षा लिहिते की,
गेल्या २५ वर्षांपासून हे आमचे दुकान आहे. आम्ही आमच्या दुकानाला क्वचित भेट देतो. पण प्रत्येक वेळी आम्ही इथे जातो तेव्हा , आम्हाला आमच्या सध्या सुरु असलेल्या कामाचे नवीन पोस्टर दारात लावलेले आढळते. माझे बाबा कुठून हे फोटो मिळवतात हे मला माहित नाही. पण हो, हे माझ्या पालकांचे प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्याची ही पद्धत आहे. आमच्या पालकांना आमचे यश साजरे करताना पाहणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आहे❤️सदैव कृतज्ञ!
तितिक्षा तावडे व्हायरल व्हिडीओ
तारक मेहता या हिंदी व अनेक मराठी मालिकांमधून पोहचलेल्या अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबू तावडे या दोघीही सख्या बहिणी आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोंमधून त्यांच्यात असलेलं बाँण्डिंग दिसून येतं. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुकानाचं नाव हे खुशबूच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. तर दारावर तितिक्षाच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा पोस्टर लावलेला आहे. तितिक्षा व खुशबू दोघींनी काही वर्षांपूवी स्वतःचा एक कॅफे सुद्धा सुरु केला आहे.