गेली कित्येक वर्षे टीव्हीवर प्रेक्षकांचं खळखळून हसवणारा कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची यशस्वी घौडदौड सुरुच आहे. या मालिकेतील दया, जेठालाल, चंपकदादा, टप्पू सेना, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभीसह शोमधील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या घराघरांतील एक अविभाज्य भाग बनले आहेत. लहान मुलं असो वा किंवा मग ज्येष्ठ मंडळी सर्वच वयोगटातील प्रेक्षक ही मालिका वारंवार पाहणं पसंत करत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेतील बच्चे कंपनी देखील आता मोठी झालीय. अनेक कलाकारांनी तर मधूनच या मालिकेला रामराम केलाय. तर काही कलाकार हे मालिकेच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत मालिकेशी जोडले गेले आहेत. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे मास्टरच्या मुलीची भूमिका साकारणारी निधि भानुशाली सध्या मालिकेत दिसत नसली तरी लोक आजही तिला मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात. निधी तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरीच सक्रिय असते.
व्हायरल होतोय जुना फोटो
निधी भानुशाली ही नेहमीच तिच्या सोशल मीडियावर पेजवर स्वतःचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. निधी कायमच अगदी फॅशनेबल आणि एडवेंचर्स लाइफ जगत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे बिकिनी फोटोज प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता तिचा एक अनसीन फोटो सध्या व्हायरल होतोय. तिच्या या अनसीन फोटोमध्ये बॅकग्राउंडला जे काही होताना दिसतंय, ते पाहून फॅन्सच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
फोटोतल्या बॅकग्राउंडकडे सर्वांचं लक्ष
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह याने निधीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या एका पोस्टमध्ये तिचे काही अनसीन फोटोज शेअर केले आहेत. यातल्या तिसऱ्या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. ही पोस्ट ३ वर्षापूर्वीची आहे. परंतू आता हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. निधीच्या या अनसीन फोटोमध्ये बॅकग्राउंडला असेलेल्या दोन व्यक्तींकडे सर्वाचे डोळे फिरतात. हे पाहून निधीच्या फॅन्सच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलंय. बॅकग्राउंडमध्ये दोनजण एकमेकांना मिठी मारताना दिसून येत आहेत. हे पाहून असं वाटतंय की ते एकमेकांना किस करत आहेत. हा फोटो पाहून फॅन्सनी आता निधिला प्रश्न विचारण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे निधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली आहे.
View this post on Instagram
रीता रिपोर्टरने विचारलं, “कोण आहेत ते?”
या मालिकेत रिता रिपोर्टरची भूमिका साकारणारी आणि मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी प्रिया आहुजा हिने देखील निधीला सवाल केलाय. फोटोमध्ये बॅकग्राउंडला कोण आहेत, असं तिने निधीला विचारलंय. सोबतच तिने कुशला देखील विचारलं, लोक जाणू इच्छित आहेत मागे नक्की कोण आहेत? मात्र अद्याप ते दोघे कोण आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.