छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असून त्याना एक रोल मॉडेल महणून पाहिलं जाते. या मालिकेतील दया, जेठालाल, चंपकदादा, टप्पू सेना, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभीसह शोमधील सर्वच पात्रं प्रेक्षकांच्या घराघरांतील एक अविभाज्य भाग बनले आहेत. लहान मुलं असो वा किंवा मग ज्येष्ठ मंडळी सर्वच वयोगटातील प्रेक्षक ही मालिका वारंवार पाहणं पसंत करत असतात.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील सर्व पात्रांना खूप सरळ आणि सध्या अंदाजात दाखवण्यात आले आहे. मात्र खऱ्या आयुष्यात हे कलाकार खूप बोल्ड आणि बिधास्त आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी निधी भानुशालीचा बोल्ड अंदाजातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि आता सोनूच्या आईची भूमिका साकारणारी सोनालिका जोशीचा बोल्ड अंदाजातील फोटो शूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalika Joshi (@jsonalika)

सोनालिका जोशी गेल्या १३ वर्षांपासून माधवी भिडेच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र मालिकेत सोज्वळ गृहिणीची भूमिका साकारणारी सोनालिका खऱ्या आयुष्यत खूप ग्लॅमरस असून तिचा हा अंदाज पाहुन तुम्ही थक्क व्हाल. सोनालिका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. तिने बोल्ड अंदाजातील फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम  अकाऊंटवर शेअर केला होते. यातील एका फोटोत तिने हातात चक्क बिडी धरली असल्याचे दिसत आहे.

tarak-mehta
(Photo-Facebook)

सोनालिकाचा नवीन लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या आधी पण तिने तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. दरम्यान तारक मेहताच्या कास्टबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. काही दिवासांपूर्वी बबिता आणि टप्पूची भूमिका साकारणारे मूनमून आणि राज आनंदकत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र नंतर दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत या अफवा आहेत हे स्पष्ट केलं.

Story img Loader