प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि ‘ह हा हि ही हु हू’ च्या बाराखडीने तुफान लोकप्रिय झालेले ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’हे नाटक लवकरच पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर सादर होणार आहे. वेगवेगळ्या संस्थांनी या नाटकाचे आजवर पाच हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत.
स्वत:तोरडमल यांच्यासह अरुण सरनाईक, मोहन जोशी, दीनानाथ टाकळकर, सुनील तावडे, अतुल परचुरे, राजन पाटील आदींनी हे नाटक गाजविले आहे. काही महिन्यांपूर्वी नाटकाच्या पाच हजाराव्या प्रयोगाच्या निमित्ताने शिवाजी मंदिर येथे एका सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
एन नाईन आर्टस बॅनरतर्फे निमेश सावे यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन राजन पाटील करत आहेत. नाटकात अभिनेते अशोक शिंदे, प्रदीप पटवर्धन, दिप्ती पाटणकर, मृणालिनी जांभळे, गौरव सावे, सिद्धांत घरत, सुबोध शिंदे, देवेश काळे, रत्नाकर देशपांडे हे कलाकार आहेत.
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांच्या निवासस्थानी नाटकाचा नुकताच मुहूर्त झाला. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नाटकाचा पहिला प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा