ग्रॅमी अवॉर्ड विजेती गायिका टेलर स्विफ्ट जगभरातल्या सर्वात यशस्वी महिलांपैकी एक आहे. पण आता तिची मांजर ऑलिविया बेन्सन जगभरात सर्वाधित कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्यांपैकी एक ठरली आहे. AllAboutCats.com च्या रिपोर्टनुसार ऑलिविया जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
गायिका टेलर स्विफ्टकडे तिची मांजर ऑलिविया २०१४ पासून आहे. ऑलिविया व्यतिरिक्त टेलरकडे आणखी दोन मांजरी आहेत. त्यांची नावं मेरेडिथ ग्रे आणि बेंजामिन बटन अशी आहेत. अर्थात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या यादीत मात्र मेरेडिथ किंवा बेंजामिन यांच्या नावाचा उल्लेख नाही. तर फोर्ब्स २०२२च्या अहवालानुसार टेलर स्विफ्ट ४७०० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
आणखी वाचा- “माझी हत्या होऊ शकते पण…” बॉलिवूडबाबत करण जोहरचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
फोर्ब्स-शैलीची यादी जगभरातील सर्व लोकप्रिय पाळीव प्राण्यांसाठी असते असं म्हटलं जातं. त्यांच्या इन्स्टाग्राम डेटाच्या माध्यमातून कोणता पाळीव प्राणी किती कमावतो याचा अंदाज बांधला जातो. ऑलिवियाचं असं कोणतंही सोशल मीडिया अकाउंट नाही. मात्र टेलर स्विफ्ट अनेकदा तिच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मात्र ऑलिवियाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. वेबसाइने दिलेल्या माहितीनुसार टेलरची मांजर ऑलिविया वर्षाला ८०० कोटींची कमाई करते.
आणखी वाचा-“हे सर्व झाल्यावर मला…” आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थना बेहेरेनं दिलेलं स्पष्ट उत्तर
ऑलिवियाने टेलर स्विफ्टबरोबर अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने टेलर ब्लँक स्पेस यांसारख्या काही म्यूझिक व्हिडीओमध्येही काम केलं आहे. ऑलिवियाची स्वतःची मर्चेंडाइज लाइन आहे. तिने सोशल मीडियावर बरीच लोकप्रियता मिळवली आहे आणि तिच्या नावाने बरीच फॅनपेजही इन्स्टाग्रामवर चालवली जातात. दरम्यान या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या यादीत ओपरा विन्फ्रेचा श्वान, फॅशन डिझायनर कार्ल लेगेरफेल्डची मांजर यांचाही समावेश आहे.