लग्नासारखा एक मजेदार आणि धमाकेदार विषय असलेल्या ‘ते आठ दिवस’ या सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च नुकतंच मोठ्या दिमाखात करण्यात आलं. या सिनेमातून एक वेगळा आणि चांगला विषय मोठ्या कलाकारांसह बघायला मिळणार आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूक लॉन्चला यावेळी सिनेमातील स्टारकास्ट आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नव्या कलाकारांचा बहारदार अभिनय यातून बघायला मिळणार आहे. येत्या ३० ऑक्टोबरला हा सिनेमा महाराष्ट्रातील विविध सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे.
ही कथा आहे एका स्त्रीची जी अठरा वर्षांनंतर परत येते. आपल्या मुलीसाठी…एका अशा स्त्रीची जी आपल्या नव-याची, आपल्या मुलीची, आपल्या कुटुंबाची क्षमा मागून पुन्हा त्यांच्यासोबत राहण्यास आली आहे. आणि ही गोष्ट आहे एका मुलीची, जी अचानक लग्नाच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तिच्या मनात आपल्या भविष्याविषयी असंख्य प्रश्न आहेत.
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातला एक असा सोहळा आहे, ज्याच्या चांगल्या आणि वाईट आठवणी नेहमीसाठी मनात घरून राहिलेल्या असतात. अशाच एका लग्नाची गोष्ट धमाकेदार गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मस्त कथेला उत्तम कलाकारांचीही साथ मिळाली आहे. श्याम स्वर्णलता धानोरकर दिग्दर्शित या सिनेमात लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे, तुषार दळवी, आरोह वेलणकर, दिपाली मुचरीकर, सुनील जोशी, अतुल तोडणकर, मीना सोनवणे, अभिलाषा पाटील, सुहासिनी परांजपे, अभिषेक देशमुख, आशय कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी, रमेश सोळंकी यांच्या भूमिका असून आशुतोष गायकवाड या बालकलाकाराचीही भूमिका आहे.
सिनेमाची निर्मिती श्वेता स्नेहल सुधीर जाधव, किशोर धारगलकर आणि शेखर प्रधान यांनी केली असून शशांक केवळे यांनी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. सिनेमातील गीतांना विकास भाटवडेकर यांनी संगीत दिले असून सौमित्र यांची गीते आहेत. तर पार्श्वसंगीत पंकज पडघन यांनी दिले आहे. सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफी आदेश वैद्य यानी केली असून छायाचित्रण नवनीत मिसार यांचं आहे. तर कला दिग्दर्शन चेतन शिकरखाने यांचे आहे.

Story img Loader