यूट्यूबर भुवन बाम गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामामध्ये गुंतलेला आहे. ‘बीबी की वाईन्स’ (BB Ki Vines) या नावाने तो एक यूट्यूब चॅनल चालवतो. भारतातला पहिला स्टार यूट्यूबर अशी ओळख असलेल्या भुवनने साध्या फोनवर व्हिडीओ बनवून यूट्यूब चॅनल सुरू केले होते. यूट्यूबवर मिळालेल्या अफाट यशानंतर भुवनने ‘बीबी की वाईन्स प्रोडक्शन’ (BB Ki Vines productions) या नावाने स्वत:ची निर्मिती संस्था सुरू केली. या निर्मिती संस्थेची पहिली वेब सीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती.

भुवन बाम सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. काही महिन्यापूर्वी भुवन बामने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओच्या माध्यमाने त्याने ‘ताजा खबर’ या आगामी वेब सीरिजची घोषणा केली होती. नेहमी विनोदी भूमिका साकारणारा भुवन या सीरिजमध्ये अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. नुकताच ताजा खबरचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Image of the BSE building.
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट
Arvind kejriwal dr babasaheb ambedkars Fact Check marathi
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू….
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
Year Ender 2024 Bollywood Celebrity Who Have Welcomed Babies in 2024
Year Ender 2024: यंदा बॉलीवूडच्या कोण-कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला, जाणून घ्या…
Shiva
Video: “या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच…”, अखेर शिवा व आशू एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार; मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

टीझरवरुन सीरिजशी संबंधित बरीचशी माहिती समोर आली आहे. सीरिजचे कथानक मुंबईमध्ये राहणाऱ्या ‘वसंत गावडे’ ऊर्फ ‘वश्या’ या पात्राभोवती फिरते. अशा प्रकारची ग्रे शेड असलेली भूमिका भुवनने आधी कधीही केली नसल्यामुळे तो ताजा खबरबद्दल खूप उत्सुक आहे. या वेब सीरिजमध्ये भुवनसोबत मराठमोळी श्रिया पिळगावकर दिसणार आहे. तसेच प्रथमेश परब, देवेन भोजानी, जेडी चक्रवर्ती अशा कलाकारांनी या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. “एका वरदानाने बदलली वश्याची गोष्ट..” असे कॅप्शन टाकत भुवन देखील इन्स्टाग्रामवर टीझर शेअर केला आहे.

आणखी वाचा – ऐश्वर्या रायला तृषा कृष्णन पडली भारी, जाणून घ्या नेमकं काय घडलं

भुवन बाम जगभरातल्या सर्वोत्कृष्ट यूट्यूबर्सपैकी एक आहे. भारतामध्ये यूट्यूब या डिजीटल माध्यमात क्रांती घडवण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे. भुवनकडून प्रेरणा घेऊन बऱ्याच जणांनी या माध्यमामध्ये काम करायला सुरुवात केली. तो प्रामुख्याने काही मिनिटांचे व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतो. विशेष म्हणजे यामध्ये असणारे प्रत्येक पात्र भुवन स्वत: साकारतो. करोना काळात त्याची ‘धिंडोरा’ ही वेब सीरिज यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आली होती. धिंडोरामध्येही भुवनने सहा-सात व्यक्तिरेखा केल्या आहेत.

Story img Loader