अभिनेता दिलजीत दोसांझ आज करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देण्यात तो यशस्वी झाला आहे. आता पुन्हा एकदा तो आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिणार आहे. त्याच्या आगामी ‘जोगी’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा
या चित्रपटाची कथा १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीख दंगलीत अडकलेल्या एका शीख मुलावर आधारित आहे. चित्रपटची गोष्ट ही त्या तरुणाच्या धैर्याची आणि लढ्याची आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा विषय दिलजीतच्या हृदयाच्या खूप जवळचा असल्याचे त्याने सांगितले आहे.
दिलजीत पुढे म्हणाला, “माझा जन्म १९८४ सालचा आहे. मी ही कथा ऐकून मोठा झालो आहे. मी काही दिवसांपूर्वी पंजाब १९८४ हा पंजाबी चित्रपटही बनवला होता, ज्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे हा विषय माझ्यासाठी खरोखरच महत्त्वाचा आहे आणि अली सरांनी योग्य कथा निवडली आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्याने जास्तीत जास्त प्रेक्षक हा चित्रपट बघू शकणार आहेत.”
आणखी वाचा : बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
या चित्रपटाचे शूटिंग कोरोनाच्या काळात झाले होते आणि तेव्हा त्यांनी असेही सांगितले होते की, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट बघण्याची गरज पडणार नाही. अली अब्बास झाफर दिग्दर्शित, कुमुद मिश्रा, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्युब आणि हितेन तेजवानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.