भारतात हॉरर चित्रपट फार कमी तयार होतात. रामसे बंधु आणि त्यानंतर काही प्रमाणात राम गोपाल वर्मा या दोन फिल्ममेकर्सनी भयपटांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही भयपट हे फार कमी आहेत, आता नयनतारासारखी अभिनेत्री ‘कनेक्ट’ नावाचा हॉरर चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकताच याचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि टीझर पाहून लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.

हा टीझर पाहून प्रेक्षकांनी याची तुलना हॉलिवूडच्या भयपटांशी करायला सुरूवात केली आहे. टीझर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे हा केवळ ९५ मिनिटांचा चित्रपट असेल ज्यात मध्यांतर नसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट सलगच बघावा लागणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत बहुदा हा असा प्रयोग प्रथमच होत आहे, त्यामुळे लोक यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

आणखी वाचा : उर्फी जावेदची ‘मोबाईल चार्जर ब्रा’ चर्चेत! Instagram वर व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, “फूल…”

टीझरची सुरूवात चेन्नईतील काही लोकप्रिय ठिकाणांपासून होते. त्यानंतर नयनतारा आणि सत्यराज यांनी साकारलेल्या चित्रपटातील प्रमुख पात्रांचे भयभीत चेहेरे आपल्यासमोर येतात. टीझरमध्ये एका लहान मुलीचा आवाज ऐकू येत असतो. ती रडत असते आणि “आई, मला सोड. मला भीती वाटते”.असं म्हणत असते. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेरदेखील यात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

अश्विन सरवणन दिग्दर्शित, ‘कनेक्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने नयनतारा दुसऱ्यांदा आश्विनबरोबर काम करणार आहे. ‘माया’ हा त्यांचा पहिला चित्रपट पॅरानॉर्मल थ्रिलर होता. नयनताराचा पती विघ्नेश शिवन याने या आगामी ‘कनेक्ट’ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader