अफाट वेग आणि त्या वेगाच्या साहाय्याने कार रेसिंगमधील काळे विश्व उलगडणारा ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ चित्रपटातील प्रसिध्द अभिनेता पॉल वॉकरचा अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया भागात शनिवारी रात्री एका कार्यक्रमातून परतताना कार अपघातात दु:खद अंत झाला. पॉल वॉकरचा ज्या गाडीत मृत्यू झाला तिचे भाग चोरीला गेल्याचे पुढे असे असून, पोलिसांनी एका १८ वर्षाच्या युवकाला याबाबत अटक केली आहे. लॉस एंजिलिस पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या या संशयिताचे नाव जेम्सन विटी असे आहे. पॉल आणि त्याच्या मित्राचा ज्या गाडीत अपघात झाला, त्या ‘२००५ पोर्शे कॅरेरा जीटी’ गाडीचे काही भाग अपघातस्थळावरून लगेचच चोरीला गेले होते. यानंतर, अपघात झालेली ही गाडी पोलिस विभागाकडून ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता परिसरातील एका घरात गाडीचे लाल रंगाचे छप्पर सापडले. पोलिसांच्या या कारवाईमुळे ते विटीपर्यंत पोहचू शकले. या प्रकरणातील दुसऱ्या संशयीताचा सुगावा पोलिसांना लागला असून, लवकरच तो स्वत:ला पोलिसांच्या हवाली करणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा