करोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध आले होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर निर्बंधमुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा थाटामाटात सर्व सण साजरे होणार आहेत. गणेशोत्सवातून संपलेला उत्साह यंदा निर्बंधमुक्तीमुळे पुन्हा एकदा जल्लोषात साजरा होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून तेजस बर्वेला ओळखलं जाते. नुकतंच त्याने गणेशोत्सवानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता तेजस बर्वे हा कायम विविध कारणांनी चर्चेत असतो. तेजस सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. सध्या तो बॉस माझी लाडाची या मालिकेत काम करताना दिसत आहे. तेजस हा पुण्याचा आहे. त्याने नुकतंच आगामी गणेशोत्सवाच्या निमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. तेजसने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने ढोल-ताशा वाजतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने एक खास पोस्टही शेअर केली आहे.
“प्रिय लक्ष्मी रोड… गेली २ वर्ष तू आम्हाला आणि तितकंच आम्ही तुला मिस केलंय रे…चल.. या वर्षीपासून तेच आपलं पूर्वीचं नातं पुन्हा जगू…बाप्पा पुन्हा येतोय आपल्यासोबत तोच समाधान चौकातला गजर, पावसात ओली झालेली आणि पाय रंगवून टाकणारी रांगोळी, शगुन चौकातला खेळ, अलका चौकातला शेवटचा गजर पहायला…पुन्हा ‘तोच’ लक्ष्मी रोड पहायला…. बाप्पा ह्या वर्षी वाजत गाजत या..”, असे तेजस बर्वेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्याच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहे. तेजसप्रमाणे अनेकजण यंदाच्या गणेशोत्सवासाठी सगळेजण मोठ्या प्रमाणावर उस्तुक आहेत. दरम्यान, तेजस हा सध्या सोनी मराठीवरील ‘बॉस माझी लाडाची’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तो आलोक हे पात्र साकारताना दिसणार आहे. आलोकच्या एन्ट्रीने मालिकेत नेमकं काय वळण येतं याची उत्सुकता सध्या सर्वांनाचा पाहायला मिळत आहे.