स्मॉल स्क्रिनवरील सर्वांची लाडकी सुनबाई तेजश्री प्रधान ही ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेनंतर गायब झाली होती. सध्या ती कोणत्या मालिकेत झळकत नसली तरी ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना दररोज काही ना काही अपडेट देताना दिसून येतेय. अग्गबाई सूनबाई या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन आता बरेच महिने उलटले तरी अद्याप ती कुठेही झळकेली नाही. अशातच तेजश्री प्रधान एका फोटोमुळे चर्चेत आलीय.

झी मराठीवरील ‘होणार सून मी..’ मालिकेतू घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलंय. छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही तेजश्री प्रधानने आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. अखेरला ती ‘अग्गबाई सासूबाई या मालिकेत झळकली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन आता बरेच महिने उलटले आहेत. पण तेव्हापासून तेजश्री स्मॉल स्क्रिनपासून दूर आहे. तसंच ती सोशल मीडियापासून देखील काही काळ लांब होती. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगताना पाहायला मिळत होत्या. त्यानंतर आती तिच्या एका फोटोची मात्र बरीच चर्चा होतेय.

dr arun datar Surya namaskar loksatta
आठवड्याची मुलाखत : ‘सूर्यनमस्कार हे व्रतासारखे; त्यात सातत्य महत्त्वाचे’
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
shivani rangole mother started new venture
मास्तरीण बाईंनी दिली आनंदाची बातमी! शिवानी रांगोळेच्या आईने सुरू केला ‘हा’ नवीन उपक्रम; म्हणाली, “लहानपणी मला…”
Marathi actor Ankush Chaudhari special post for ashok saraf
“माझ्या करिअरच्या सुरुवातीला १९९५मध्ये…”, अंकुश चौधरीने अशोक सराफांबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
entrepreneur ujjwala phadtare story in marathi
नवउद्यमींची नवलाई : कृत्रिम प्रज्ञेच्या पुरवठादार
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो

अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तिने नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर क्यूट स्माईल देत बाकावर बसून पोज देत हा फोटो क्लिक केलाय. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर आणि डॅझलिंग दिसत आहे. यात तिने रेड टॉप आणि ब्लू जीन्स परिधान केलेली आहे. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने लिहिलेली ही कॅप्शनच सध्या तिच्या चर्चेत येण्यामागचं कारण आहे. “तुमच्या आयुष्यात काहीतरी नविन घडणारेय…जे सारं काही सकारात्मक मार्गाने बदलून टाकेल.”, असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by

Story img Loader