Tejashree Pradhan Viral Video: होणार सून मी या घरची मालिकेतून घरोघरी पोहोचलेली जान्हवी म्हणजेच अनेकांची लाडकी तेजश्री प्रधान हिचा एक मुंडावळ्या बांधलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे एकीकडे झी मराठी वर काहीच दिवसांपूर्वी ‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे पुनःप्रक्षेपण सुरु झालं असताना नेमक्या त्याच वेळी तेजश्रीने असा व्हिडीओ टाकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओवर तेजश्री पुन्हा १२ वर्षांनी का होईना पण योग आलाच असंही लिहिलं आहे.
पुन्हा दिसणार का श्री- जान्हवी एकत्र?
तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही जोडी मंदार देवस्थळी यांची मालिका ‘होणार सून मी या घरची’ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरलं. आणि याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्रीच्या जवळीक वाढली. आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ८ फेब्रुवारी २०१४ मध्ये शशांक- तेजश्रीने पुण्यात लग्न केलं मात्र अवघ्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. सध्या तेजश्री आपल्या लव्ह लाईफबद्दल मौन बाळगून आहे, तर शशांकने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.
तेजश्री प्रधानचा Video का होतोय व्हायरल?
तेजश्रीने ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यासह दोन फोटो असणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात १२ वर्षांपूर्वीचा फोटो आणि १२ वर्षांनंतर पुन्हा त्यांच्यासह स्क्रीन शेअर करण्याचा योग आल्याचं तिने लिहिलं आहे. तेजश्री लिहिते की, “इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला. पण तितकंच भारी फिलिंग आहे मोहन काका. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात त्यातील काहीच शेवटपर्यंत राहतात. माझ्या पाठिशी कायम असल्याबद्दल तुमचे खूप आभार मोहन काका.”
हे ही वाचा<< “दुर्दैवाने मला तिच्याबरोबर.. ” स्वप्नील जोशीने ‘या’ मोठ्या अभिनेत्रीचं नाव घेत बोलून दाखवली मनातली मोठी सल
तेजश्रीने डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा मोहन आगाशे व तेजश्री स्क्रीन शेअर करणार आहेत.