अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजवर मराठी मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये उत्तमोत्तम काम केलं. पण तुम्हाला माहित आहे का? तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या देखील मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी मराठी चित्रपट, मालिकांमध्ये कमालीचं काम केलं आहे. नुकतंच ज्योती यांना मानाचा समजला जाणाऱ्या ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली. तसेच एक भावूक पोस्ट देखील शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Boyz 3 Teaser : पुन्हा एकदा तुफान राडा, ‘बॉईज ३’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

कलासृष्टीमध्ये जवळपास ५० वर्ष ज्योती यांनी काम केलं. त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्याक्षणाचा आनंद त्यांच्या कुटुंबियांसाठी शब्दात मांडणं थोडं अवघडच होतं. आईला ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करत असताना तेजस्विनीही तिथे उपस्थित होती. यादरम्यानचे काही फोटो देखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. तसंच आईचं तेजस्विनीने तोंडभरुन कौतुक केलं आहे.

तेजस्विनीने आईचं कौतुक करत असताना म्हटलं की, “आईच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तिचा सहवास आम्हाला मुली म्हणून खूप उशीरा मिळाला. आईच्या हाताची चव आम्ही पहिल्यांदा वयाच्या १६व्या वर्षी चाखली. अशा आईसोबत असण्याचे अनेक क्षण आम्हाला अनुभवता आले नाहीत. पण ह्याची अजिबात तक्रार नाही. कारण आमची आई आमचं घर संभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन, अनेक बलिदानं देऊन स्वतःचं अस्तित्व घडवत होती. आज तिला हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना बघून तिचा संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार झालो.”

आणखी वाचा – Photos : मालदीवमध्ये पोहोचल्या ‘आई कुठे काय करते’मधील कांचन आजी, नवऱ्यासोबत शेअर केले फोटो

पुढे ती म्हणाली, “बाबा असता तर हा पुरस्कार स्वीकारताना आईलचा आनंद द्विगुणित झाला असता. कारण तिच्या या यशामध्ये त्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आई घरी नसताना बाप असून आईची भूमिका बाबाने लीलया पेलली.” आईचा अभिमान असल्याचंही तेजस्विनीने म्हटलं आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ज्योती यांनी उत्तम भूमिका साकारल्या. त्यांनी मराठी नाटकांमध्येही उत्तमोत्तम काम केलं.