अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी, ४ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षांच्या होत्या. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
२०१०मध्ये सिंधुताई यांच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात तेजस्विनी पंडितने सिंधुताईंची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या निधनानंतर तेजस्विनीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. सर्वांनी सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहिली मात्र तेजस्विनीने सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट केली नव्हती त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. पण आता आपल्या पोस्टमधून तेजस्विनीने टीकाकारांना उत्तर देत माईंच्या आठवणींना उजाळा दिला.
काय आहे तेजस्विनीची पोस्ट?
“अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस. पोस्ट नाही केलं? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी. काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले… कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही… पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि यात त्यांचा हातभार आहे याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला… कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस ! “अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई,” असे तेजस्विनी पंडितने म्हटले आहे.
पुढे ती पोस्टमध्ये म्हणाली, “महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील. लोकहो एक विनंती….घाई घाई ने आरआयपी लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death. तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो. ओम शांती. माई…. तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई.”