अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswwini Pandit) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्विनी सध्या तिच्या रानबाजार (Raanbaazaar) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तेजस्विनीने नुकतीच ‘रानबाजार’ या तिच्या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि प्रतिसादाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन…”, रणवीर सिंगने केलेलं खळबळजनक वक्तव्य

तेजस्विनीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनीने ‘रानबाजार’ सीरिजमधील तिची भूमिका आयेशाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “ऐकून छान वाटतंय ! तुम्हाला Ayesha ची कहाणी आवडतेय….बघितली का? रानबाजार’, ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर !” असे कॅप्शन तेजस्विनीने दिले आहे.

आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारतातील टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

सोशल मीडियावर या सीरिजविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर तेजस्विनी आणि प्राजक्ताला त्यांच्या बोल्ड भूमिकांमुळे ट्रोल करण्यात येत आहे. अभिजित पानसे सारखा दिग्दर्शक, दमदार कथानक, ‘प्लॅनेट मराठी’ सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तगडी स्टारकास्ट अशा सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. प्रत्येक क्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी अशी ही सिरीज आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे ,माधुरी पवार,सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे असे आघाडीचे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejaswwini pandit post on raanbaazaar went viral on social media dcp