छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे बिग बॉस फेम कपल सुयश राय आणि किश्वर मर्चेंट. किश्वरने २७ ऑगस्टला मुलाला जन्म दिला. दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी ही आनंदाची बातमी इन्स्टाग्राम पोस्टद्वारा दिली. किश्वर आणि तिच्या बाळाचे -निरवैर रायचे त्यांच्या घरी दणक्यात स्वागत झाले.  दोघे बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या सुयश आणि किश्वरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. चाहत्यांना त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात आवडत आहे.

किश्वर आणि सुयश दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे ते बाळासाठी एक खास गोष्ट केली आहे. दोघांनी त्यांच्या मानेवर एक टैटू गोंदवून घेतला आहे. या टैटू त्यांच्या बाळाचे नाव निरवैर असे लिहिले असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओत ती तिचा मुलगा झोपला आहे आणि ती काही तरी एक्साइटिंग करत आहे, असे बोलताना दिसली आहे. नंतर ते दोघं टैटू च्या दुकानात जाऊन त्यांच्या मुलाच्या नावाचा टैटू काढताना दिसत आहेत. या व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. याला हाजारोच्या संखेत लाइक्स मिळत आहेत.

किश्वर आणि सुयशने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, “# निरवैर किती लकी आहे ज्याला तुमच्या सारखे आई-वडील आहेत, सतत आनंदत रहा..”. दुसऱ्या युजरने लिहिलं, निरवैर तू खुप लकी बाळ आहेस.”

(Photo-Instagram/ Suyash rai, Kishwer Merchant)

किश्वर आणि सुयश फॅन्स त्यांना प्रेमाने सुकिश असे म्हणतात. ‘बिग बॉस’ नंतर सुयश त्याच्या संगितावर फोक्स करत आहे. त्याचा आणि किश्वरचा एक यूट्यूब चॅनल देखील आहे. किश्वर स्टार प्लसवरील ‘कहा हम कहा तुम’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती.

Story img Loader