टीव्ही विश्वात नवनवीन घडामोडी घडत असतात. टाळेबंदीमध्ये लोकांनी जुन्या दर्जेदार मालिका पुन्हा पुन्हा बघितल्या. ‘आभाळमाया’, ‘प्रपंच’, ‘४०५ आनंदवन’, ‘थरार’ या मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. डेली सोप हा प्रकार उदयास आल्यानंतरदेखील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘देवयानी’. प्रेक्षकांसाठी म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा पाहता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आई कुठे काय करते’, ‘या फुलाला सुगंध मातीचा’ स्टार प्रवाहवरील या मालिका आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र १० वर्षांपूर्वी गाजलेली मालिका म्हणजे ‘देवयानी’. रात्री ८. ३० वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित व्हायची. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. या मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. देवयानी, संग्राम, आबासाहेब अशी प्रसिद्ध पात्र. संग्रामचा ‘तुमच्यासाठी काही पण’ हा डायलॉग खूप प्रचलित झाला होता.

या मालिकेत शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, नागेश भोसले, देवदत्त नागे, माधव देवचके, भाग्यश्री मोटे असे दिग्गज कलाकार या मालिकेत होते . या मालिकेची लोकप्रियता पाहता वाहिनीने या मालिकेचे पुनःप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला असून ही मालिका १८ डिसेंबर पासून संध्याकाळी ४.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होईल. वाहिनीच्या या निर्णयाने या मालिकेचे चाहते नक्कीच खुश होतील.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2012 famous marathi serial devayani now telecasting again on star pravah spg