भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. गुजरातमधील जामनगरमध्ये या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत अनेक कलाकार या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये दाखल झाले होते. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता बॉलीवूड कलाकारांनंतर एका मराठमोळ्या अभिनेत्यालाही जामनगरची ओढ लागल्याचे दिसून येत आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कुणी नसून आयुष संजीव आहे. झी मराठीवरील ३६ गुणी जोडी या मालिकेतून आयुष प्रसिद्धीझोतात आला. आपल्या अभिनयाने आयुषने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर आयुष मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. अशातच त्याच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आयुषने इन्स्टाग्रामवर त्याचे ट्रेडिशन ड्रेसवरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आयुषने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता व त्यावर निळ्या रंगाचा शेला घेतला होता. या फोटोंना आयुषने दिलेल्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “मी चाललो जामनगरला.” या फोटोवरून आयुष आता अंबानींच्या कार्यक्रमासाठी चालला की काय, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

आयुषची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं, “तुलापण अंबानींनी बोलवलं का?”, तर दुसऱ्याने कमेंट करत “तू पण चाललास? ” असे विचारले आहे.