९०च्या दशकापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची चर्चा नेहमी होतं असते. त्यांनी अभिनयाव्यतिरिक्त सौंदर्य, तारुण्य आणि आपल्या डान्सने अनेकांची मनं जिंकली आहेत. ऐश्वर्या नारकरांचे इन्स्टाग्रामवरील रील व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात. यामुळे अनेकदा त्या ट्रोलही होतात. पण, त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देऊन त्यांची तोंड बंद करतात.
नुकतंच ऐश्वर्या नारकरांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतलं. ज्यामध्ये चाहते त्यांना प्रश्न विचारू शकतात. यावेळी ऐश्वर्या नारकरांच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. काहींनी त्यांच्या आवडत्या साडीविषयी विचारलं, तर काहींनी आवडता पदार्थ, आवडता हॉलीवूड हिरोबद्दल विचारलं.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
एका चाहत्याने विचारलं की, मुंबईत कुठे राहता? मी रविवारी भेटायला येणार आहे. यावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “पूर्ण बोरिवली आपलीच.” तसंच दुसऱ्या चाहत्याने आवडत्या पदार्थाविषयी विचारलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणाल्या, “उकडलेला भात + तूप + मीठ + हिरवी मिरची.” तिसऱ्या चाहत्याने विचारलं, “तुमचं ९०च्या दशकात आवडतं गाणं कोणतं?” ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, आशिकी
त्यानंतर एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना थेट डिनरसाठी विचारलं. तो म्हणाला, “मला एकदा तुमच्याबरोबर डिनर करायचा आहे…तारीख सांगा.” यावर अभिनेत्रीने जबरदस्त उत्तर दिलं. त्यांनी अशी तारीख सांगितली, जी अस्तित्वाच नसते. ३० फेब्रुवारी २०२५ ही तारीख ऐश्वर्या नारकरांनी सांगितली.
हेही वाचा – Video: गंगा आरतीत तल्लीन झाली परिणीती चोप्रा, राघव चड्ढाही होते सोबतीला, पाहा व्हिडीओ
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये पाहायला मिळत आहेत. पण त्या आता रुपाली म्हात्रे नाहीतर मैथिली सेनगुप्ताच्या भूमिकेत दिसत आहेत.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेला दोन वर्ष पूर्ण झाली असून सध्या दुसरं पर्व सुरू आहे. पहिल्या पर्वात ऐश्वर्या यांनी अद्वैतची आई रुपालीची भूमिका साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या पर्वात ऐश्वर्या नव्या भूमिकेत झळकल्या. यात त्यांनी डॉ. मैथिली सेनगुप्ता भूमिका साकारली आहे. या मैथिली सेनागुप्तामध्येच शतग्रीव नावाच्या असूराने प्रवेश करून विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव कोलकातातून महाराष्ट्रात आल्याच दाखवलं. त्यानंतर नेत्राच्या घरी पोहोचून मैथिलीने आता तिच्याशी जवळीक साधली आहे.