आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं. आज सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांच्या लग्नाचा ३२ वा वाढदिवस आहे. या दोघांचा प्रेमविवाह आहे. सुचित्रा यांच्या घरून आदेश आणि त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. पण त्यापूर्वीची यांची प्रेम कहाणी खूप रोमांचक आहे. यादरम्यान घडलेला एक मजेशीर प्रसंग आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात शेअर केला होता. तो म्हणजे, सुचित्राच्या वडिलांना बघताच आदेश बांदेकर यांनी पळ काढला होता.

आदेश बांदेकर यांनी सुचित्राला प्रपोज केल्यावर सुचित्रा यांनी त्या क्षणी आदेशला होकार दिला होता. यानंतर या दोघांचं भेटणं वाढू लागलं. सुचित्राचे वडील खूप कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांचा या दोघांना खूप धाक वाटायचा. त्यांना अजिबात कळू न देता ही दोघं भेटत असत. रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तेथून बाहेर निघताना ते गप्पा मारत असतानाच सुचित्रा यांचे वडील समोर आले.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…
pravin tarde birthday his wife snehal tarde
“भाईचा बर्थडे गाणं…”, प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहलची मिश्किल पोस्ट, म्हणाली…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी

आणखी वाचा : “१०६ वर्षांची पेशवाई फक्त…”; शरद पोंक्षेंचं बाजीराव पेशवेंबद्दलचं वक्तव्य चर्चेत

नक्की पाहा – Video : अभ्युदयनगरमधील छोटसं घर ते आलिशान फ्लॅट, आदेश बांदेकरांच्या स्वीट होमची झलक पाहिलीत का?

सुचित्राने वडिलांना येताना पाहिले आणि लगेच आदेशला म्हणाल्या, “दादा आले.” अचानक सुचित्राचे वडील तिथे पोहोचल्याने क्षणाचाही विलंब न करता आदेश यांनी तिथून पळ काढला आणि किचनमध्ये जाऊन लपले. सुचित्राच्या वडिलांना ते आदेश बांदेकर होते असा संशय आला. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना याबद्दल विचारणा केली. परंतु कोणीही ठोस उत्तर दिलं नाही.

हेही वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तेवढ्यात आदेश आतमधून वेटरच्या कपड्यात आले आणि सुचित्रा यांच्या वडिलांसमोरून निघून गेले. आदेश वेटरच्या कपड्यात असल्याने सुचित्राच्या वडिलांना त्यांना ओळखता आले नाही. हा प्रसंग आजही त्या दोघांच्या लक्षात आहे, असं त्यांनी ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात सांगितलं होतं.