महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम हा सध्या ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ सांभाळत आहे. याच प्रोडक्शनची ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या मराठी मालिकाविश्वात अधिराज्य गाजवतं आहे. टीआरपीच्या यादीत ही गेल्या वर्षभरापासून पहिल्या स्थानावर ठाण मांडून आहे. अशात आता सोहम प्रोडक्शनच्या बॅनरखालील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रेश्मा शिंदे व अभिनेता सुमीत पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्चपासून सुरू होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने सध्या आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर व सोहम विविध एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधताना दिसत आहेत.

बांदेकर कुटुंबाने नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी त्यांना सोहमच्या लग्नाचं टेन्शन घेणार कोण आहे? असं विचारण्यात आलं. तेव्हा सुचित्रा बांदेकर व सोहम यांनी आदेश यांच्याकडे बोट दाखवलं. त्यानंतर सुचित्रा म्हणाल्या, “आदेश बांदेकर आहेत. ह्याला फार वाटतं असतं एखादी नवीन, सुंदर मुलगी दिसली की, ही कशी आहे? मग मी म्हणते, अरे पण लग्न कोणाला करायचं आहे, सोहमला ना? मग सोहमला शोधू दे. त्याने आणली की मग आपण म्हणायचं छान आहे. तू कशा शोधतोय? यावर आदेश म्हणतो, तो शोधत नाही. तो मुर्ख आहे.”

हेही वाचा – “माझं गोंडस लेकरू…” म्हणत नम्रता संभेरावने मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; चिमुकला रुद्राज म्हणाला…

पुढे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “ती एक जाहिरात होती ना…एक वडील जॉगिंग करणाऱ्या मुलाच्या मागे फेटा घेऊन फिरत असतो ना, तसं याचं आहे. कुठली मुलगी दिसली की, अरे बापरे ही सोहमला छान दिसेल, उंची चांगली आहे. त्यामुळे आदेश सोहमच्या मागून मुंडावळ्या घेऊन फिरत असतो, असं मला दिसत.”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगनंतर ईशा अंबानीच्या होळी पार्टीची चर्चा; माधुरी दीक्षितसह देसी गर्लचा हटके अंदाज व्हायरल

या सगळ्यावर सोहम म्हणाला, “सध्या मला माझं काम महत्त्वाचं वाटतं आहे. त्याच्यात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे, ९ वाजता आत गेलो की ५ वाजता बाहेर निघेन असं नाही होतं. तुम्ही दिवसभर कामात असता. पण मी या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार नाही देते. लवकरच माझे काही प्रोजेक्ट येणार आहेत. माझं एवढं वय देखील नाहीये.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadesh bandekar is in a hurry to marry son soham suchitra bandekar told the story pps