राज्यातील सत्तासंघर्षानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने सोमवारी(१० सप्टेंबर) दिलं. निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह मिळाल्यानंतर अभिनेते आदेश बांदेकर यांनी जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदेश बांदेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडीओ असून त्यात बांदेकरही डान्स करताना दिसत आहेत. ‘उधे गं अंबे उधे’ या ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाण्यावरील डान्सचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला काही जण हातात मशाल घेऊन स्टेजवर एन्ट्री घेत आहेत. त्यानंतर बांदेकरही या डान्समध्ये सहभागी होताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा >> Video : “झुकेगा नहीं साला”, न्यूयॉर्कच्या महापौरांना अल्लू अर्जुनची भूरळ, ‘पुष्पा’स्टाइल व्हिडीओ एकदा पाहाच

हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

बांदेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओचा संबंध राज्यातील राजकारणाशी लावला जात आहे. अभिनय क्षेत्रात सक्रिय असण्याबरोबरच बांदेकर राजकारणातही कार्यरत आहेत. मालिकांमध्ये काम करत असतानाच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजकारणात येण्याचा कोणताच विचार नव्हता, तरीही माझी बाळासाहेबांवर श्रद्धा होती, असं ते एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते.

हेही वाचा >> Video : अभ्युदयनगरमधील छोटसं घर ते आलिशान फ्लॅट, आदेश बांदेकरांच्या स्वीट होमची झलक पाहिलीत का?

आदेश बांदेकर शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव आहेत. त्यांच्यावर ‘सिद्धीविनायक मंदीर ट्रस्ट’च्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. बांदेकर शिवसेनेच्या अनेक मेळाव्यांमध्येही सहभागी होताना दिसतात. नुकत्याच शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या दसऱ्या मेळाव्यातही त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadesh bandekar shared old video after election commision gave mashal to shivsena uddhav thackeray kak
Show comments