मराठी चित्रपटसृष्टीमधील पावरफुल कपल म्हणजे आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर. नेहमीच दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतं. या दोघांचाही प्रेमविवाह. कुटुंबियांचा दोघांच्या लग्नाला विरोध असल्यामुळे आदेश व सुचित्रा यांनी चक्क पळून लग्न केलं होतं. आज (१४ नोव्हेंबर) त्यांच्या लग्नाचा ३२ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आदेश व सुचित्रा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा – “बाजीराव पेशवे छत्रपतींची गादी बळकावू शकले असते पण…” शरद पोंक्षेंनी सांगितला बाजीरावांचा मोठेपणा
आदेश व सुचित्रा यांना एक मुलगाही आहे. सोहम बांदेकर स्वतः कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल तो ठेवत आहे. सोशल मीडियाद्वारेही तो आई-वडिलांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसतो. आताही त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
सोहमने आदेश व सुचित्रा यांचा एकत्रित फोटो शेअर करत म्हटलं की, “३२वा लग्नाचा वाढदिवस. तुम्हाला बघूनच मला कॉम्प्लेक्स येतो. माझं कसं होणार?” असं म्हणत सोहमने आपल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा – Video : अभ्युदयनगरमधील छोटसं घर ते आलिशान फ्लॅट, आदेश बांदेकरांच्या स्वीट होमची झलक पाहिलीत का?
सुचित्रा यांना आदेश बांदेकर यांनी प्रपोज करताच त्यांनी लगेचच होकार दिला. होकारानंतर दोघांमध्ये जवळीक आणखीनच वाढत गेली. पण सुचित्राचे वडील कडक शिस्तीचे होते. कुटुंबियांना कळू न देता दोघंही भेटायचे. पण नंतर त्यांनी लग्न केलं. आज त्यांच्या या संपूर्ण प्रवासाला ३२ वर्ष पूर्ण झाली आहेत.