अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी सोहमने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सोहम बांदेकरची भूमिका असलेली नवे लक्ष्य ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सोहमने स्वत: याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने नवे लक्ष्य या मालिकेच्या टीमबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने ही मालिका लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आणखी वाचा : “मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

“आज नवे लक्ष्य या मालिकेचा शेवटचा भाग चित्रीत झाला. असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. जय दीक्षित आणि नवे लक्ष्यवर प्रेम केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद स्टार प्रवाह, अभिजीत खाडे, नरेंद्र मुधोळकर”, अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

आणखी वाचा : “आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती.

Story img Loader