अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी सोहमने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर ही मालिका पुन्हा सुरु करावी अशी विनंती अनेक चाहते करत होते. अखेर सोहम बांदेकरने ही मालिका लवकरच परतणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने त्याच्या चाहत्यांसाठी Ask me anything या सेशनचे आयोजन केले होते. यावर त्याने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. यावेळी सोहमला तुझा आवडीचा रंग कोणता, तुला काय खायला आवडते, तुझे आवडते फास्ट फूड काय? याबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले होते. त्याची त्याने फार हटके पद्धतीने उत्तर दिली.
आणखी वाचा : ‘तू माझा क्रश आहेस’ म्हणणाऱ्या चाहतीला सोहम बांदेकरचे हटके स्टाईल उत्तर, म्हणाला “हेच मला…”

pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
twist in Akshay Shinde case, Badlapur sexual assault Accused shinde parents demand to mumbai high court for closure of case
अक्षय शिंदे प्रकरणात नवे वळण : प्रकरण पुढे लढायचे नाही, ते बंद करा, आरोपी अक्षय शिंदे याच्या आईवडिलांची उच्च न्यायालयात मागणी
badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
Animal Husbandry Commissionerate, Tagging ,
रखडलेली पशुगना ४२ टक्क्यांवर; जाणून घ्या आढावा बैठकीत सचिवांनी काय आदेश दिले
Pre-monsoon work, Mumbai , Municipal Commissioner,
पावसाळापूर्व कामांना आतापासूनच सुरुवात करावी, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश

सोहम बांदेकरची भूमिका असलेली नवे लक्ष्य ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. या सेशनवेळी सोहमला एका चाहत्याने नवे लक्ष्य मालिकेबद्दल विचारले आहे. “नवे लक्ष्य मालिका परत सुरु करा. शनिवार आणि रविवारी. प्लीझ, प्लीझ, प्लीझ”, अशी विनंती त्या चाहत्याने केली आहे. त्यावर सोहमनेही कमेंट करत ही मालिका पुन्हा सुरु होण्याचे संकेत दिले आहेत.

“हो हो नक्कीच! असंच प्रेम सतत राहू द्या..! येऊ लवकरच”, असे त्याने यावर उत्तर देताना म्हटले आहे. त्याच्या या उत्तरानंतर नवे लक्ष्य ही मालिका पुन्हा सुरु होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती.

Story img Loader