गेल्या काही महिन्यांपासून अनेक दाक्षिणात्य चित्रपट हे सुपरहिट ठरताना दिसत आहे. त्या तुलनेत बॉलिवूडसह इतर भाषांच्या चित्रपटांना तितकं यश मिळालेले दिसत नाही. तमिळ, तेलुगू, मल्याळम अशा प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती मिळताना दिसत आहे. यावरुनच मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असा फरक केला जात आहे. यावर आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर याने प्रतिक्रिया दिली.
अभिनेता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी सोहमने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला.
आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने त्याच्या चाहत्यांसाठी Ask me anything या सेशनचे आयोजन केले होते. यावर त्याने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे.
नुकतंच एका चाहत्याने त्याला मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी यातील फरकाबद्दल विचारले. तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी यामध्ये काय फरक वाटतो? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सोहमने ‘भाषा’ असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने त्याने प्रेक्षकांसह चाहत्यांचेही मन जिंकून घेतले.
दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती.