Aai Aani Baba Retire Hot Aahet : ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकांनंतर आता लवकरच आणखी काही नव्या मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच ‘उदे गं अंबे’ मालिकेचा पहिला प्रोमो प्रसारित करण्यात आला. या पाठोपाठ आता आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या नव्या मालिकेचं नाव ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ असं आहे. या मालिकेत लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. घरातलं सर्व काम आवरणं, जेवण बनवणं, नातवंडाना सांभाळणं असं सगळं काम करताना निवेदिता या प्रोमोमध्ये दिसत आहेत.

Chinmay Mandlekar come back on star pravah as writer after 15 years
१५ वर्षांनंतर चिन्मय मांडलेकर ‘स्टार प्रवाह’साठी करणार काम, निवेदिता सराफ यांच्या नव्या मालिकेत अभिनेता म्हणून नव्हे तर…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
aai kuthe kay karte fame madhurani gokhale share her new character on social media
‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती झळकणार नव्या भूमिकेत; अभिनेत्रीचा नवीन लूक चर्चेत
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Ude Ga Ambe New Marathi Serial
‘स्टार प्रवाह’वर सुरु होणार नवी पौराणिक मालिका! देवदत्त नागे साकारणार भगवान शिवशंकर, तर अभिनेत्री आहे…; पाहा जबरदस्त प्रोमो
zee marathi savlyachi janu savali marathi serial starcast
तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”
Marathi actress Mrunal Dusanis talk about new serial of star pravah
“मी खूप कृतज्ञ आहे…”, नव्या मालिकेविषयी सांगताना मृणाल दुसानिसचं वक्तव्य, म्हणाली, “मालिकेचं नाव…”

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणार नवी पौराणिक मालिका! देवदत्त नागे साकारणार भगवान शिवशंकर, तर अभिनेत्री आहे…; पाहा जबरदस्त प्रोमो

‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका

निवेदिता सराफ यांच्या जोडीला या मालिकेत अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रोमोमध्ये त्यांचा रिटायरमेंटचा दिवस असतो. “रिटायर झाल्यावर आपण दोघे मिळून गावी जाऊया” असं ते आपल्या पत्नीला सांगत असतात. परंतु, निवेदिता मुलांची व कुटुंबाची काळजी कशी घेणार याचा विचार करत असतात. आता हे जोडपं रिटायर झाल्यावर गावी जाणार की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ( Aai Aani Baba Retire Hot Aahet ) या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेता चेतन वडनेरे याने “मंगेश कदम सर अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा” अशी कमेंट करत या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये फक्त निवेदिता व मंगेश कदम यांची जोडी पाहायला मिळाली. यामध्ये इतर कलाकार कोणते झळकणार हे लवकरच उघड करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तुमचा टेलर बारामतीचा दिसतोय”, धनंजयचं जॅकेट पाहून रितेशने घेतली फिरकी; म्हणाला, “बारामतीची स्टाईल…”

Aai Aani Baba Retire Hot Aahet
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ( Aai Aani Baba Retire Hot Aahet )

‘स्टार प्रवाह’ने अद्याप या मालिकेची वेळ व तारीख जाहीर केलेली नाही. आता ही मालिका ( Aai Aani Baba Retire Hot Aahet ) नेमकी कोणत्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे लवकरच स्पष्ट केलं जाईल.