Aai Aani Baba Retire Hot Aahet : ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकांनंतर आता लवकरच आणखी काही नव्या मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच ‘उदे गं अंबे’ मालिकेचा पहिला प्रोमो प्रसारित करण्यात आला. या पाठोपाठ आता आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या नव्या मालिकेचं नाव ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ असं आहे. या मालिकेत लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. घरातलं सर्व काम आवरणं, जेवण बनवणं, नातवंडाना सांभाळणं असं सगळं काम करताना निवेदिता या प्रोमोमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणार नवी पौराणिक मालिका! देवदत्त नागे साकारणार भगवान शिवशंकर, तर अभिनेत्री आहे…; पाहा जबरदस्त प्रोमो

‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका

निवेदिता सराफ यांच्या जोडीला या मालिकेत अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रोमोमध्ये त्यांचा रिटायरमेंटचा दिवस असतो. “रिटायर झाल्यावर आपण दोघे मिळून गावी जाऊया” असं ते आपल्या पत्नीला सांगत असतात. परंतु, निवेदिता मुलांची व कुटुंबाची काळजी कशी घेणार याचा विचार करत असतात. आता हे जोडपं रिटायर झाल्यावर गावी जाणार की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ( Aai Aani Baba Retire Hot Aahet ) या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेता चेतन वडनेरे याने “मंगेश कदम सर अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा” अशी कमेंट करत या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये फक्त निवेदिता व मंगेश कदम यांची जोडी पाहायला मिळाली. यामध्ये इतर कलाकार कोणते झळकणार हे लवकरच उघड करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तुमचा टेलर बारामतीचा दिसतोय”, धनंजयचं जॅकेट पाहून रितेशने घेतली फिरकी; म्हणाला, “बारामतीची स्टाईल…”

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ( Aai Aani Baba Retire Hot Aahet )

‘स्टार प्रवाह’ने अद्याप या मालिकेची वेळ व तारीख जाहीर केलेली नाही. आता ही मालिका ( Aai Aani Baba Retire Hot Aahet ) नेमकी कोणत्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे लवकरच स्पष्ट केलं जाईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai aani baba retire hot aahet star pravah new marathi serial promo out now nivedita saraf will play lead role sva 00