मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. काल (२४ जुलै) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. नुकतंच मिलिंद गवळी यांनी जयंत सावरकर म्हणजेच अण्णांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जयंत सावरकरांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबरच त्यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या काही आठवणींनाही उजाळा दिला.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“असं जगता आलं पाहिजे”
अण्णांसारखा ( जयंत सावरकरांसारखा ) ,
माणसाला मिळालेलं हे सुंदर आयुष्य माणसाने कसं छान जगावं हे अण्णां आपल्याला शिकवून गेले,
आपल्या कामावर, आपल्या कलेवर असं प्रेम करावं, सातत्याने, वर्षानुवर्ष, मन लावून, अगदी श्रद्धेने कला कशी जोपासावी हे अण्णांकडूनच आपण शिकलं पाहिजे,
१९८४ सालापासून ची आमची ओळख,
गोविंद सराया यांच्या “वक्ते से पहिले” मध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केले, त्यानंतर १९९४-९५ मध्ये मनोहर सररवणकरांच्या “दैव जाणिले कुणी” या दूरदर्शन च्या टेलीफिल्म आम्ही बापलेकाची भूमिका केली त्यानंतर एकदम २०२२-२३ मध्ये “आई कुठे काय करते” मध्ये काम केलं.
म्हणजे तब्बल ३८ वर्षा मी अण्णांना माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ओळखतो ,
आता वयाच्या ८६-८७ वर्षाचे अण्णा “आई कुठे काय करते” च्या सेटवर , यायचे अगदी “वेळेवर” call time च्या अर्धा तास आधी. अगदी छान तयार होऊन , एखादा छानसा कुडता घालून त्याच्यावर छानस जॅकेट आणि Hat असायची,
मग वेळ न घालवता मेकअप करून, costume घालून, स्वतःच धोतर छानस नेसून, एकदम रेडी व्हायचे,
मग दिवसभराचे सगळे सीन्स ते मागून घ्यायचे,
मग त्या अख्या सीन्सचं मनन चिंतन पाठांतर करत शांतपणे बसायचे, बरं अण्णांनाच त्या सीन्स मध्ये जास्त बोलायचं असायचं, बरं एक दोन पानं नाही तर १७ ते १८ पानांचा एक सीन असायचा. पाठ करून त्यांना ज्या काही शंका, किंवा suggestions असतील त्या व्यवस्थित त्याचं निरसन करून घ्यायचे, एकदा का त्यांच्या डोक्यात तो सीन फिट बसला की मग ते गप्पा मारायला मोकळे व्हायचे,
माझी आणि अण्णांची एकच मेकअप रूम होती,
त्यामुळे अण्णांच्या जुन्या जुन्या आठवणी ऐकायला फार मजा यायची, ते Encyclopedia होते, अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा त्यांना detail मध्ये आठवायच्या,
बारा ते चौदा तासाचं शूटिंग, जिथे अगदी so call तरुण मंडळी संध्याकाळपर्यंत ढेपाळलेली असायची, इथे अण्णा पॅकअप होईपर्यंत अगदी fresh ,active ,energetic असायचे, हसत मुख ,
Set वर एका professional कलाकाराने कसे असायला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.
अण्णां नी इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत की
ज्यांना ज्यांना तुमच्याबरोबर काम करायची संधी, सौभाग्य मिळालं आहे ते खरंच भाग्यवान आहेत,
मी आत्ताच जवाहर बाग स्मशान भूमी ठाणे येथे अण्णांचं Electric Cremation करून घरी आलो, आत्ता आण्णा शरीराणे नाहीत पण
यांचा प्रसन्न चेहरा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवला आहे, मिश्किल स्वभाव , आयुष्यं कसं छान जगाव.
आण्णा माझ्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहेत, असे मिलिदं गवळींनी म्हटले.

आणखी वाचा : Video : “माणसं नेटवर्कमध्ये आहेत, पण कोणी…” जयंत सावरकरांचा आईसोबतच्या संभाषणाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

दरम्यान जयंत सावरकर यांना ‘अण्णा’ या नावाने सर्वजण हाक मारायचे. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या प्रगल्भ अभिनयाचा ठसा उमटवला. वयाच्या विसाव्या वर्षी, १९५४ सालापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केले.

Story img Loader