स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेमधील कलाकारांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. ‘आई कुठे काय करते’मध्ये कांजन आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अर्चना पाटकर. अर्चना यांना या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं. सोशल मीडियावरही त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. आता अर्चना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेली पोस्ट विशेष लक्षवेधी ठरत आहे.
आणखी वाचा – मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो शेअर करत म्हणाली, “मी स्वतःच…”
अर्चना यांनी आजवर कलाक्षेत्रामध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. अर्चना यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन वडिलांबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अर्चना यांनी वडिलांनी त्यांना पाठवलेल्या जुन्या पत्राचा फोटो शेअर करत म्हटलं की, “माझ्या वडिलांनी मी खूप लहान असताना हे पत्र लिहिलं होतं. ते सरकारी कार्यालयामध्ये ऑडिट अधिकारी म्हणून काम करायचे. भारतातील विविध भागामध्ये त्यांची बदली व्हायची.”
आणखी वाचा – Photos : मालदीवमध्ये पोहोचल्या ‘आई कुठे काय करते’मधील कांचन आजी, नवऱ्यासोबत शेअर केले फोटो
“त्यांनी हे पत्र जेव्हा आम्हाला पाठवलं तेव्हा मी ६ ते ७ वर्षांची होते. बाबांनी आम्हाला पाठवलेली सगळी पत्रं आई वाचायची.” अर्चना यांनी शेअर केलेलं हे पत्र अगदी जुनं आहे. तसेच त्यांच्या वडिलांचं त्यांच्यावर असणारं प्रेम या पत्राद्वारे दिसून येतं.