छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच चर्चेत असते. सध्या या मालिकेत एक वेगळाच ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत आरोही नावाच्या नवीन पात्राची एंट्री झाली आहे. तिच्यावर काही श्रीमंत घरातील मुलांनी बलात्कार केल्याचे यात दाखवलं जात आहे. या सर्व घटनेमध्ये देशमुख कुटुंबीय आरोहीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहताना दिसत आहे. यानिमित्ताने अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सर्वच कलाकार हे प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. याच मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबर त्यांनी लांबलचक पोस्टही केली आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असा stand घेतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो ?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही, अनिरुद्ध च नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे, काही काही situations मध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, surprise करतो सगळ्यांना, मी पण ज्या वेळेला script वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक smile येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात, मनातल्या मनात नमिता वर्तक हिला thank you सुद्धा म्हणत असतो.

पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही काही बाबतीत माणसाने ठांब भूमिका घ्यायलाच हवी , योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी, मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये corruption आहे, पण एखादा पोलिस वाला कितीही corrupt असला तरी असं म्हटलं जातं की Rape ,Murder, Drink & Drive आणि drugs या cases मध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही , गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही, कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं.

या scene मध्ये ज्यावेळेला तू आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो, त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्ध ची एक नव्याने ओळख होत जाते, आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुख च्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात, पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे”, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘गडकरी’ चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता, पहिला लूक आला समोर

दरम्यान ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. कधी अरुंधतीच्या आयुष्यात वादळ येते तर कधी संजनाच्या आयुष्यात काही तरी नवे सुरु होते. आता आरोहीवर बलात्कार करण्याऱ्या मुलांना शिक्षा होणार असल्याचे दिसत आहे. पण त्यांना जामीन मिळावा म्हणून पोलिसांवर दबाव टाकण्यात येत आहे. ती सर्व मुले ही मोठ्या आणि श्रीमंत घरातून असल्यामुळे ही केस लवकर बंद होईल असे आशुतोषला वाटते. आता खरच त्यांची सुटका होणार की शिक्षा होणार हे येत्या भागात स्पष्ट होईल.